सध्या कोरोनाची झालेली गंभीर स्थिती लक्षात घेता सर्वजण अडचणीत आहेत. हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. या संकटकाळात एकमेकांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच सर्व जनतेने आजपर्यंत जे प्रेम आशीर्वाद दिले त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. म्हणून कोरोना सारख्या संकटकाळात अडचणीच्या वेळी जनतेसोबत ठामपणे उभे राहणे. हे मी माझे कर्तव्य समजतो. व अशा कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोकणात मदतीचे अनोखं पाऊल.
रायगड रत्नागिरीतील सर्व सेवा एका क्लिकवर - 100% मोफत नोंदणी

        दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑफलाईनही पाहता येणारी आधुनिक वेबसाईट-वेबॲप 2in1 findallinone.com अविनाश पाटील यांनी विकसित केली आहे.

      सामाजिक भान राखून लोकांना अडचणीच्या काळात अत्यावश्यक सेवा व वस्तू काळजीपुर्वक घरपोच मिळाव्यात आणि सोबतच स्थानिक संतुलन राखता यावे म्हणून रायगड व रत्नागिरीतील सर्व सेवा एका क्लिकवर वेबसाईट व ॲपच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे.
      रायगड जिल्ह्यातील महाड येथील तरुणाने आपली कल्पकता वापरून दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून 2in1अशा आधुनिक वेबसाईट अधिक ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप फोनच्या ब्राऊजरमधून ॲड टू होमस्क्रिन वर क्लिक करून एका सेकंदात इन्स्टॉल करता येते. कॉम्प्युटर – लॅपटॉप पासून ते टॅबलेट – मोबाईल पर्यंत सर्व ठिकाणी पाहता येईल. इंटरनेट नसतानाही ॲप चालू करू शकता. सर्व बाजूने यामध्ये बारकाईने विचार केला आहे.  यात होतकरू तरुणांपासून ते वयोवृद्ध सर्वाना हे ॲप अतिशय उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक व्यावसायिक – ग्राहक यांना प्रामुख्याने याचा उपयोग होणार आहे. पुढे पर्यटक व इतर कारणासाठी ये-जा करणाऱ्याना देखील फार उपयोगी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व तरुण देखील या मोहिमेशी जोडले जात आहेत, जेणेकरून एका ठिकाणी सर्व माहितीचे स्त्रोत उपलब्ध होतील. सर्व युवकांना या मोहिमेशी जोडण्याचे अविनाश पाटील यांनी आवाहन केले आहे.

मराठी
English मराठी