परिचय

मी श्री. अविनाश गणपत पाटील. सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. समाजाचे आपण देणे लागतो व त्यासाठी काहीतरी दीर्घकाळ टिकेल असे करून ठेवायचं या विचारातून,  रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील वेबॲप/वेबसाईट बनविली आहे. यातून सर्व थरातील मराठी जनतेला उद्योगात चालना देणे, स्थानिकांना रोजगाराच्या संधीची वेळोवेळी माहिती करून देणे व इतर अनेक महत्वाच्या गोष्टी सर्वसामान्य मराठी जनतेपर्यंत सहजरित्या उपलब्ध करून देण्यासंदर्भातील माहिती याद्वारे मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानातुन लाईट वेट आणि ऑफलाईन पाहता येईल अशा वेबॲप ची निर्मिती केली आहे.

सध्या कोरोनाची झालेली गंभीर स्थिती लक्षात घेता सर्वजण अडचणीत आहेत. हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. या संकटकाळात एकमेकांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच सर्व जनतेने आजपर्यंत जे प्रेम आशीर्वाद दिले त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. म्हणून कोरोना सारख्या संकटकाळात अडचणीच्या वेळी जनतेसोबत ठामपणे उभे राहणे. हे मी माझे कर्तव्य समजतो. व अशा कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोकणात मदतीचे अनोखं पाऊल..

रायगड रत्नागिरीतील सर्व सेवा एका क्लिकवर - 100% मोफत नोंदणी

         दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑफलाईनही पाहता येणारी आधुनिक वेबसाईट+ॲप 2in1 findallinone.com अविनाश पाटील यांनी विकसित केली आहे.
        सामाजिक भान राखून लोकांना अडचणीच्या काळात अत्यावश्यक सेवा व वस्तू काळजीपुर्वक घरपोच मिळाव्यात आणि सोबतच स्थानिक संतुलन राखता यावे म्हणून रायगड व रत्नागिरीतील सर्व सेवा एका क्लिकवर वेबसाईट व ॲपच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे.
        रायगड जिल्ह्यातील महाड येथील तरुणाने आपली कल्पकता वापरून दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून 2in1अशा आधुनिक वेबसाईट अधिक ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप फोनच्या ब्राऊजरमधून ॲड टू होमस्क्रिन वर क्लिक करून एका सेकंदात इन्स्टॉल करता येते. कॉम्प्युटर – लॅपटॉप पासून ते टॅबलेट – मोबाईल पर्यंत सर्व ठिकाणी पाहता येईल. इंटरनेट नसतानाही ॲप चालू करू शकता. सर्व बाजूने यामध्ये बारकाईने विचार केला आहे.
        यात होतकरू तरुणांपासून ते वयोवृद्ध सर्वाना हे ॲप अतिशय उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक व्यावसायिक – ग्राहक यांना प्रामुख्याने याचा उपयोग होणार आहे. पुढे पर्यटक व इतर कारणासाठी ये-जा करणाऱ्याना देखील फार उपयोगी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व तरुण देखील या मोहिमेशी जोडले जात आहेत, जेणेकरून एका ठिकाणी सर्व माहितीचे स्त्रोत उपलब्ध होतील. सर्व युवकांना या मोहिमेशी जोडण्याचे अविनाश पाटील यांनी आवाहन केले आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दैनंदिन गरजा, होम डिलेव्हरी, दुकानदार, सर्व्हिसेस, डॉक्टर्स, आरोग्यविषयक, हॉटेल/उपहारगृह, खानावळ, दुरुस्ती विषयक, बांधकाम, वॉटरप्रूफिंग, गृहसजावट, देणे/घेणे, भाडेविषयक, कंन्सल्टंट, पेस्ट कन्ट्रोल, कला-कौशल्य, टेलर/फॅशन, सणसमारंभ, कॅटरर्स, नोकरीविषयक, क्लासेसविषयक, शैक्षणिक, महा ई-सेवा, हरवले/सापडले, संकटकालीन, स्थानिक माहिती आणि शासकीय वेबसाईट्स या सुविधा देणाऱ्या व्यावसायिक आदी संस्थांची नावे, पत्ते व संपर्क देण्यात आले आहेत. आणि ज्यांना या ॲपवर नोंदणी करायची असेल त्यांनी त्यांचे नाव, व्यवसायाचे नाव, पत्ता आणि संपर्क (किंवा व्हिजिटिंग कार्ड)- अशी रीतसर माहिती ८५३०५७५४८३ या व्हाट्सॲप क्रमांकावर देण्याचे आवाहन अविनाश पाटील यांनी केले आहे. नोंदणी १०० टक्के मोफत आहे.

ॲपमुळे होणारा सकरात्मक परिणाम:
१. रोगराई संसर्ग काळात घरूनच संपर्क साधून, दिलेल्या वेळेतच भेटून गर्दी टाळू शकतो.
२. स्थानिक उद्योजक-ग्राहक देवाणघेवाण व्हावी व सोबत भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन रोजगार निर्मिती शक्य होय.
३. मातृभाषेत असल्यामुळे मराठी वाचता येणारा कोणीही व्यक्ती याचा उपयोग करून हित साध्य करू शकतो.
४. नवीन आणि फार महत्वाची माहिती वेळीच मिळाल्याने एखाद्याचे प्राण तसेच फसवणुकीपासून वाचविता येईल.
५. पालकांना एखादे शाळा, कॉलेज, क्लासेस आणि कला क्षेत्राची माहिती सहज पाहता येणार आहे.
६. शासकीय व फार महत्वाच्या वेबसाईटची लिस्ट उपलब्ध.
७. इंटरनेट नसतानाही PWA टेक्नॉलॉजी च्या मदतीने पुन्हा पाहू शकतो.

अभिप्राय:
१. अविनाश पाटील यांनी विकसित केलेल्या वेबॲपची संकल्पना खरंच वाखण्याजोगी आहे, त्यामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंधू भगिनींना व्यापार वाढीसाठी खुप मोलाची ठरणार आहे. – मधुरा पवार, चिपळूण (प्रतिष्ठित उद्योजिका)
२. रायगड रत्नागिरीतील स्थानिकांना दिली गेलेली अमूल्य देणगीच म्हणावी लागेल. अशा डिजिटल क्रांतीद्वारे स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊलवाट चालू आहे. – राकेश शिंदे, माणगाव (सॉफ्टवेअर इंजिनियर)
३. तरुणांना शैक्षणिक व इतर कलागुणांना वाव देण्याची सुवर्णसंधी, कमी वेळेत तालुक्याची तोंडओळख शक्य. – धीरज ठाकूर सर, महाड (मुख्यध्यापक)
४. एकदा पाहिलेली माहिती इंटरनेट कनेक्शन नसतानाही तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा पाहू शकतो. इंटरनेट अभावी गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली आहे. – दत्ता महाडीक सर, रत्नागिरी (विशेष अधिकारी, महाराष्ट्र शासन)
५. स्थानिक मराठी समाजासाठी काहीतरी दीर्घकाळ देण्याचा प्रयत्न, तळमळ यातून स्पष्ट दिसून येतो. – आशिष घोसाळकर, माणगाव (प्रतिष्ठित व्यापारी)
६. या ॲपमुळे घरबसल्या तरुणांना उद्योगात चालना व उपलब्ध रोजगाराच्या संधीचा फायदा मिळेल. ऑनलाईन व्यवहार तरुणांनी सावधपणे करावेत. – दीप्तीताई माटे, चिपळूण (माजी सभापती व शिक्षिका)
७. जबरदस्त संकल्पना: माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड या ॲप मध्ये असुन या ॲप ला रजिस्ट्रेशन विनाशुल्क आणि सतत इंटरनेटची आवश्यकता नसल्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक उद्योजक, सेवाभावी संस्था, खरेदी विक्री करणारे घरेलू आणि व्यावसायिक, विद्यार्थी यांना नक्कीच लाभदायक ठरेल! – बाळकृष्ण कासार, रत्नागिरी (लोकनिर्माण संपादक)
८. तुमच्या सारख्या व्यक्तीची जरूरत आहे आजच्या पिढीला. जे दुसऱ्यासाठी आपल्या बहुमुल्य वेळ काळ भविष्यचा विचार करून जगणे पसंद करतात. – अरविंद चिंदक, खेड (प्रतिष्ठित व्यापारी)
९. कोरोना साथीच्या भयंकर परिस्थितीत व्हेरिफाइड कॉन्टॅक्ट नंबरच्या मदतीने रुग्णाला औषध, रुग्णवाहिका, बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, डॉक्टर, ब्लड डोनर, प्लाझ्मा डोनरना संपर्क साधता येईल. – उत्तम तांबडे, महाड नगरी संपादक
१०. ज्या विचारसरणीत हा ॲप बनवला आहे त्यासाठी प्रथम खूप खूप अभिनंदन.. ह्या ॲपचा उपयोग हा नक्की च गाव खेड्या पासून शहरातील इंडस्ट्रिअल वर्गाला होणार आहे यात शंका नाही. ह्या प्रकारच्या ॲपमधून दाखवलेली अग्रगण्यात कौतुकास्पद – परेश धुमाळ, दापोली (मेकॅनिकल डिझायनिंग इंजिनियर)

विनम्र सूचना:
१. खात्रीशीर स्थानिकांमध्येच देवाण घेवाण व्हावी.
२. कोणालाही (अनोळखी) सोशल मीडिया किंवा फोनद्वारे तुमचे ओटीपी , आधारकार्ड व पॅनकार्डसारखी माहिती देऊ नये.
३. अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाईन पैसे; देणे अथवा घेणे प्रामुख्याने टाळावेत.

वेबॲपमुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला मिळणारा पाठिंबा खालीलप्रमाणे
#. रोगराई संसर्ग काळात घरूनच संपर्क साधून, वेळेतच भेटून गर्दी टाळू शकतो.
#. स्थानिक देवाणघेवाण व भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन रोजगार निर्मिती शक्य होय.
#. मातृभाषेत असल्यामुळे मराठी वाचता येणारा कोणीही व्यक्ती याचा उपयोग करून हित साध्य करू शकतो.
#. स्थानिक उद्योजक - ग्राहक यांना परस्पर संपर्क करून देणे.

#. नवीन आणि फार महत्वाची माहिती वेळीच मिळाल्याने एखाद्याचे प्राण किंवा फसवणुकीपासून बचाव करता येईल.
#. लघु व मध्यम उद्योगास चालना मिळेल.
#. पालकांना एखादे शाळा, कॉलेज, क्लासेस किंवा कला क्षेत्राची माहिती सहज उपलब्ध होईल.
#. शासकीय व महत्वाच्या वेबसाईट लिस्ट..
#. इंटरनेट नसतानाही PWA टेक्नॉलॉजी च्या मदतीने पुन्हा पाहू शकतो.

विशेष लक्षवेधी गोष्टींचा आढावा.

  • वेळेची बचत कमी वेळेत अधिक कामे पूर्ण करू शकता.
  • माहिती नसलेली गोष्ट जवळच्या परिसरातील पारंगत व्यक्ती च्या सहकार्याने पूर्ण करू शकता.
  • अगदी सहजरीत्या कोणतीही संपूर्ण माहिती मिळविण्याचे एकमेव साधन तुम्ही आखलेली रूपरेषा आणि पाहिलेली स्वप्ने या वेबसाईट/ॲपच्या जाहिरातीच्या माध्यमातून सहज साध्य करू शकता.

FIND ALL IN ONE

फ्लॅट नं. सी १०१, गोल्डन ट्रेझर्स, काटे वस्ती रोड, पुनावाले, पुणे, महाराष्ट्र ४११०३३ भारत.
Phone: 8530575483

मराठी
English मराठी